Income Tax Return: वर्ष संपण्यापूर्वी करा 'हे' काम; अन्यथा तुम्हाला भरावा लागेल जास्त कर
TAX (Photo Credits: Pixabay)

Income Tax Return: पात्र नागरिकांनी आयकर (Income Tax) भरणे खूप महत्वाचे असते. जर लोकांचे उत्पन्न करपात्र असेल तर त्यांना आयकर जमा करावा लागतो. दुसरीकडे, जेव्हा एखादी व्यक्ती आयकर भरेल तेव्हा त्याला निश्चितपणे पॅन कार्ड आवश्यक असेल. पॅनकार्डशिवाय आयकर भरता येत नाही. त्याचबरोबर पॅनकार्डशी संबंधित एक महत्त्वाचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. या कामाशिवाय तुम्हाला आयकर भरण्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि जास्त कर भरावा लागू शकतो.

पॅन कार्ड लिंकिंग -

खरं तर, आयकर विभाग अनेक दिवसांपासून लोकांना त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास सांगत आहे. आता पुन्हा एकदा प्राप्तिकर विभागाने लोकांना लवकरात लवकर त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यास सांगितले आहे, अन्यथा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.  (हेही वाचा - How To Update Aadhaar: 10 वर्षांपूर्वी आधारकार्ड बनवलेल्यांना UIDAI कडून त्याच्यात बदल करण्याचे आवाहन)

प्राप्तिकर विभागाच्या वतीने, ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारक जे सूट श्रेणीत येत नाहीत त्यांनी 31.03.2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. जे पॅन आधारशी लिंक नाहीत, ते पॅन 01.04.2023 पासून निष्क्रिय होतील.

आर्थिक वर्ष संपेपर्यंत अंतिम मुदत -

31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. जर एखाद्याने हे काम 31 मार्च 2023 पर्यंत म्हणजे आर्थिक वर्ष संपेपर्यंत केले नाही तर 1 एप्रिल 2023 पासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल. यानंतर, निष्क्रिय पॅन वापरून आयकर रिटर्न भरता येणार नाही. प्रलंबित गोष्टींवर कारवाई केली जाणार नाही. निष्क्रिय पॅनवर पैसे परत केले जाणार नाहीत आणि जास्त दराने कर देखील आकारला जाऊ शकतो. त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा.