Bank Holidays In February 2022: जानेवारी महिना संपण्यासाठी खूप कमी दिवस बाकी आहेत. अशा स्थितीत लोकांना पुढच्या महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारीच्या उरलेल्या कामाची चिंता सतावू लागते. तुमचाही फेब्रुवारीमध्ये बँकेशी संबंधित कोणताही व्यवसाय प्रलंबित असेल, तर पुढील महिन्यात बँका कधी बंद होतील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या यादीनुसार, पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, सर्वच राज्यांमध्ये इतके दिवस सुटी असणार नाही. त्यामुळे बँकेच्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी, बँकेच्या सुट्टीची यादी नक्की तपासा. दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये, वसंत पंचमी, गुरु रविदास जयंती आणि डोलजात्रा यासह सहा सुट्ट्या असतील. त्यामुळे या दिवशी देशभरातील बँका बंद असतील. दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुटी असेल. येत्या महिन्यात एकूण 12 दिवस बँकांमध्ये कामकाज सुरू राहणार नाही. यावेळी ग्राहकांना एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवा वापरता येतील. (वाचा - Aadhaar Card Photo: आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी उपयुक्त ठरतील 'या' सोप्या स्टेप्स)
फेब्रुवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे -
- 2 फेब्रुवारी 2022 : सोनम लोचर (गंगटोकमध्ये बँका बंद)
- 5 फेब्रुवारी 2022 : सरस्वती पूजा/श्री पंचमी/वसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
- 15 फेब्रुवारी 2022: मोहम्मद हजरत अली जन्मदिवस/लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँका बंद)
- 16 फेब्रुवारी 2022: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)
- 18 फेब्रुवारी 2022: डोलजात्रा (कोलकात्यात बँका बंद)
- 19 फेब्रुवारी 2022: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)
विकेंडला बंद राहतील बँका -
- 6 फेब्रुवारी 2022: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 12 फेब्रुवारी 2022: महिन्याचा दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
- 13 फेब्रुवारी 2022: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 20 फेब्रुवारी 2022: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
- 26 फेब्रुवारी 2022: महिन्याचा चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
- 27 फेब्रुवारी 2022: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
अशाप्रकारे वरील 12 दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे बँकाच्या कामकाजाचा दिवस पाहून तुम्ही बँकेत जाऊ शकता. असं केल्यास तुमचा वेळ वाया जाणार नाही.