केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना एक गूड न्यूज मिळाली आहे. दरम्यान आज (1 फेब्रुवारी) दिवशी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी ( Oil Marketing Companies) एलपीजी सिलेंडरच्या किंमती जाहीर (LPG Cylinder Price) केल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सिलेंडर गॅसच्या किंमतींमध्ये कपात जाहीर झाली आहे. आजपासून गॅस सिलेंडरचे नवे दर लागू केले जाणार आहे.
विना अनुदानित 14.2 kg Indane घरगुती सिलेंडरची दिल्ली मधील किंमत ₹899.50 असणार आहे. तर कोलकाता मध्ये ₹926,मुंबई मध्ये ₹899.50 आणि चैन्नई मध्ये ₹915.50 असणार आहे. तर कमर्शिअल 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरातही Rs 91.50 ची कपात झाली आहे. त्यामुळे दिल्लीत कमर्शिअल गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत Rs 1907 मोजावे लागणार आहे.
National Oil Marketing companies have reduced commercial 19-kg LPG cylinder cost by Rs 91.50 effective from today, 1st February. 19 kg commercial cylinder will cost Rs 1907 in Delhi from today: Sources
— ANI (@ANI) February 1, 2022
देशात ऑक्टोबर 2021 पासून विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या, मात्र आज फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमती कमी करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर 2021 पासून देशात पेट्रोल, डिझेलचेही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान सध्या देशात 5 राज्यांत विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. 10 मार्चला त्याचा निकाल जाहीर होणार आहे. हे देखील नक्की वाचा: Book LPG cylinders through WhatsApp: HP, Indane, Bharat Gas ग्राहक जाणून घ्या गॅस बुकिंगचा व्हॉट्सअॅप नंबर आणि प्रक्रिया .
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी 19 किलो कमर्शिअल एलपीजी सिलेंडरची किंमत ₹102.50 होती. तर 1 डिसेंबरला 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 100 रूपयांनी वाढवली होती. त्यामुळे दिल्लीत या गॅस सिलेंडरसाठी 2101 रूपये मोजावे लागत होते. ही दुसरी सर्वात जास्त किंमत आहे. 2012-13 मध्ये याच सिलेंडरसाठी 2200 रूपये मोजावे लागत होते.