Aadhaar Card (Photo Credits: PTI)

आधार कार्ड (Aadhar Card) सर्व भारतीय नागरिकांसाठी महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डवर नागरिकाची सर्वच माहिती दिली गेलेली असते. याच आधाराच्या मदतीने फसवणूकीच्या घटना केल्या जातात. UIDAI कडून नुकत्याच ट्विटरवर एक नोटीस जाहीर केली आहे. त्यात फसवणूकीच्या घटना घडण्यापासून मदत करण्याचे सांगितले आहे. युआयडीएआय कार्डावर 12 डिजिट क्रमांक असतो जो अधिकृत युआयडीएआय वेबसाइटच्या माध्यमातून वेरिफाय करु शकतो. दरम्यान, ओळखपत्राच्या आधारावर ते वापरण्यापूर्वी वेरिफाय करावे.

जर तुम्ही कोणत्याही सार्वजनिक कंप्युटरवर ई-आधार मॅरिटियल जर डाउनलोड करत असाल तर ते ई-आधार कार्ड डिलिट करा. तसेच युजरने त्याचा ओटीपी सुद्धा कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करु नका. ऐवढेच नव्हे तर तुमचा मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डला जोडण्याची परवानगी देऊ नका. नेहमीच आधार कार्डचा वर्च्युअल आयडीचा वापर करा. यामध्ये 16 डिजिटचे आधार कार्ड दिला जाईल. याचा वापर आधार कार्डच्या जागी वापर केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त तुमचे बायोमॅट्रिक नेहमीच लॉक ठेवा. हे काम युआयडीएआय पोर्टल येथून डाउनलोड करुन करता येईल. युजरला ते रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून अनलॉक करु शकतो.(SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! KYC च्या नावाखाली होतेय नागरिकांची लूटमार जरा सावधच रहा)

जर तुम्हाला आधार कार्ड लॉक करायचे असेल तर सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये मेसेज अॅप सुरु करा. त्यानंतर GET OTP टाइप करुन 1947 वर SMS पाठवावा लागणार आहे. आता तुम्हाला एक ओटीपी येईल. त्यानंतर LOCKUID आणि आधार कार्ड क्रमांक लिहून 1947 वर पुन्हा SMS पाठवा. असे केल्यानंतर आधार कार्ड लॉक होईल.