SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! KYC च्या नावाखाली होतेय नागरिकांची लूटमार जरा सावधच रहा
SBI (Photo Credits: Facebook)

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank Of India) ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण बँकेच्या नव्या सुविधेचा फायदा घेत फसवणूकदारांकडून नागरिकांची लूटमार केली जात आहे. सध्या बँकेच्या ग्राहकांना KYC बद्दल फसवणूक केल्याचे सांगण्यात आले आहे. या माध्यमातून फसवणूकदार ग्राहकांच्या खात्यामधून पैसे काढू शकतात. तर जाणून घ्या स्कॅमर्स कस्टमर्सला कशा पद्धतीने फसवतात आणि त्यापासून तुम्ही स्वत: चा बचाव कसा करु शकता.(Aadhaar Online Services: तुमच्या आधार कार्डचा वापर कधी, कुठे झाला ते झटपट पहा घरबसल्या!)

CyberPeace Foundation आणि Autobot Infosec च्या रिपोर्ट्सनुसार, KYC स्कॅमच्या नावाखाली चीनी हॅकर्स ग्राहकांना टारगेट करत आहेत. ही फसवणूक एक SMS किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केली जाते. SMS मध्ये बँकेच्या ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी सांगितले जाते. यासाठी मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते. या मेसेज व्यतिरिक्त तुम्हाला ईमेल सुद्धा पाठवला जाऊ शकतो.

लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एका संकेतस्थळावर नेले जाईल. ही वेबसाइट एसबीआय सारखीच दिसते. यावर तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्यायचा आहेत. त्यानुसार प्रथम म्हणजे अधिकृत संकेतस्थळाची वेबसाइट https://retail.onlinesbi.com/retail/login.htm सुरु होते. पण दुसरी गोष्ट म्हणजे बनावट वेबसाइट या अॅड्रेसच्या विरुद्ध असतो. तर CyberPeace Foundation आणि Autobot Infosec यांनी असे म्हटले की, तुम्हाला एसबीआयच्या खात्याबद्दल अधिक विचारणा केली जाते. यामध्ये युजरचे नाव, पासवर्ड, कॅप्चाची माहिती मागितली जाते. आता तुम्हाला मोबाइलवर मिळणाऱ्या ओटीपी बद्दल विचारणा करतात.(Cairn Energy Tax Dispute: भारत सरकारच्या 20 मालमत्ता जप्त करण्याचा फ्रान्स कोर्टाचा आदेश)

जर तुमच्याकडे बँकेसंदर्भातील ओटीपी मागत असल्यास सतर्क रहा. कारण यानंतर कोणताही डिटेल्स तुम्ही देऊ नका. ऐवढेच नाही तर बँकेच्या खात्याबद्दल अधिक माहिती देणे टाळा. त्यामुळे फसवणूकदार तुम्हाला या पद्धतीने निशाणा बनवून लुबाडू शकता. यासाठी कोणत्याही पद्धतीची सेंसिटिव्ह माहिती कोणत्या अज्ञात लिंकवर शेअर करु नका.