Aadhaar Online Services: तुमच्या आधार कार्डचा वापर कधी, कुठे झाला ते झटपट पहा घरबसल्या!
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

भारतामध्ये आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. बॅंक, मोबाईल फोन ते नोकरीच्या व्यवहारांमध्ये आता आधार कार्ड अत्यावश्यक आहे. सध्या देशात आधार कार्डाचा देखील गैरवापर करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आधार कार्डामध्ये प्रत्येक भारताची महत्त्वाची माहिती असते. त्याचा कोणी गैरवापर केला तर तुमचं नुकसान देखील होऊ शकतं. Aadhaar Online Services: आता mAadhaar App होणार अधिक सुरक्षित; 4 अंकी पासकोड सेट करण्याची मिळणार मुभा; इथे पहा अधिक माहिती

आधार कार्डचा वापर करून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता यूआयडीएआय कडून वेरिफिकेशन संबंधित काही ठोस पावलं देखील उचलली आहेत. आधार कार्ड शी निगडीत सुरक्षेसाठी युआयडीएआय ने पीवीसी कार्ड जारी केले आहे. तर आधार कार्ड धारक ऑनलाईन देखील त्याच्या आधारकार्ड वापराची हिस्ट्री पाहू शकतात. म्हणजे आता कधी, कुठे तुमचं आधार कार्ड वापरलं गेलं आहे याची माहिती मिळू शकते.

आधार कार्ड वापरा विषयी माहिती कशी मिळवाल? इथे पहा

  • uidai.gov.in या आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • यानंतर My Aadhaar च्या टॅब वर जा. 'Aadhaar Services'च्या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘Aadhaar Services'मधून थेट ‘Aadhaar Authentication History'या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर एक नवी विंडो ओपन होणार आहे. यामध्ये 12 अंकी आधार नंबर टाका आणि कॅप्चा कोड एंटर करून जनरेट ओटीपी चा पर्याय निवडा.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर एक ओटीपी येईल ते सबमीट करून तुम्ही पुढे जाऊ शकता.
  • आता तुमच्या स्क्रीन वर आधार कार्डच्या वापराबद्दल सारी माहिती मिळेल. यामध्ये तारीख, वेळ आणि ऑथेंटिकेशन डिटेल्स मिळतील.

Aadhaar Services on mAadhaar App: आधार कार्ड संबंधित 35 सुविधा मिळणार 'या' मोबाईल अ‍ॅपवर, पहा कसे कराल डाउनलोड.

दरम्यान आधार कार्ड बाबत अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हांला तुमचा नंबर यूआयडीआय सोबत रजिस्टर असणं आवश्यक आहे. जर तुमचा नंबर लिंक नसेल किंवा तो बदलला असेल तर तुम्हांला तो नजिकच्या आधार सेंटर मध्ये जाऊन अपडेट करावा लागणार आहे.