mAadhaar app (Photo Credits: Twitter, UIDAI)

Aadhaar Services on mAadhaar App: UDAI कडून सोमवारी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची ओळख दाखवणाऱ्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्ड संबंधित UDAI कडून एक महत्वाची बाब समोर आली आहे. त्यानुसार आधार कार्ड संबंधित 35 सुविधा एका क्लिकवर तुम्हाला मोबाइल अॅपवर मिळणार आहेत. यामध्ये आधार कार्ड डाउनलोड करणे, आधार कार्डाचे स्टेटस, आधार कार्ड रिप्रिंटसह अन्य सुविधा मिळणार आहेत. या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. यासाठी तुम्हाला स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनची गरज भासणार आहे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA संदर्भातील मोठी बातमी! 'या' दिवशी मिळणार वाढीव पगार)

UDAI यांनी केलेल्या ट्विटमध्ये तुम्हाला प्रथम mAadhaar अॅप फोनमध्ये डाउनलोड करावा लागणार आहे. यामध्ये 35 आधार कार्ड संबंधित सुविधा म्हणजे आधार कार्ड डाउनलोड, स्टेटस चेक, आधार कार्ड रिप्रिंट, आधार कार्ड केंद्र यांची माहिती स्मार्टफोनवर मिळणार आहे. ही सर्व माहिती महाआधार अॅपवर मिळणार आहे. या अॅप संबंधित लिंक्स सुद्धा शेअर करण्यात आल्या आहेत. तसेच तुम्ही तुमच्या मोबाईल मधील अॅप स्टोअरवर हे अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. तर आयफोन युजर्सने यावर क्लिक करा.

-क्लिक केल्यानंतर युजर्सला एका नवा पेजवर नेले जाईल. तेथे महाआधार अॅप तुम्हाला इंस्टॉल करण्यास सांगितले जाईल.

-अॅप इंस्टॉल झाल्यानंतर तुम्हाला अॅप सुरु करण्याचा ऑप्शन दाखवला जाईल.

-आता तुम्ही महाआधार अॅपवर तुम्ही सुविधांचा लाभ घेऊ शकता.

आधार कार्ड संबंधित कोणत्याही कामासाठी हे अॅप तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. यासाठी मात्र स्मार्टफोनची गरज भासणार आहे. या अॅपमध्ये तुमच्या आधार कार्डची सॉफ्ट कॉपी सुद्धा सेव्ह करुन ठेवू शकता.