7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA संदर्भातील मोठी बातमी! 'या' दिवशी मिळणार वाढीव पगार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी DA संदर्भातील एक मोठी बातमी आहे. कारण लवकरच लाखो कर्मचाऱ्यांना वाढीव डीए मिळण्याची शक्यता आहे. नॅशनल काउंसिल ऑफ जॉइंट कंसेल्टेटिव्ह मशीनरी या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत बातचीत करु शकतात. या बातचीत मध्ये कर्मचाऱ्यांच्या डीए बद्दल चर्चा केली जाईल. या बैठकीला आर्थिक मंत्रालयाव्यतिरिक्त डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अॅन्ड ट्रेनिंग अधिकारी सुद्धा सहभागी होणार आहेत.(New Income Tax E-Filing Portal आज होणार लॉन्च; करदात्यांनो! जाणून घ्या नव्या वेबसाईट बद्दल काही खास गोष्टी)

दरम्यान, केंद्र सरकार सोबत ही बैठक यापूर्वी मे मध्ये पार पडणार होती. परंतु देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता ती रद्द केली. मात्र आता जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते. नॅशनल काउंसिल-JCM च्या मते ही बैठक याच महिन्यात होऊ शकते.

आता कर्मचाऱ्यांना 17 टक्क्यांच्या दराने DA दिला जात आहे. पुढे 11 टक्क्यांहून वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या पगारात जबरदस्त वाढ होणार आहे. तर कर्मचाऱ्यांना थेट 2 वर्षांच्या DA चा फायदा एकत्रित मिळू शकतो. कारण जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला होता. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जून 2020 मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली होती. आता जानेवारी 2021 मध्ये महागाई भत्ता पुन्हा एकदा 4 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच एकूण 28 टक्के झालाआहे. यामुळे 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसह 61 लाख पेंन्शनर्सला फायदा होणार आहे.(Aadhaar-Driving License Linking: आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स कसे लिंक कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

केंद्र सरकारचे प्रतिनीधी आणि नॅशनल काउंसिल-JCM दरम्यानच्या सुरुवातीची बैठक 8 मे रोजी पार पडणार होती. मात्र कोरोनामुळे ती रद्द केली. त्यानंतर मे च्या अखेरच्या आठवड्यात होणार होती. पण त्यावेळी सुद्धा कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे ती झाली नाही. नॅशनल काउंसिल-JCM यांना अपेक्षा आहे की, ही बैठक या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.