Aadhaar Card-Driving License Linking | File Image

आधार कार्ड (Aadhaar Card) आणि ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) एकमेकांशी लिंक (Link) करणे बंधनकारक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे बनावट ड्रायव्हिंग लायसन्सवर आळा घालता येईल, हा या मागील उद्देश आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक केले नसेल तर यापुढे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (Regional Transport Office) आरटीओच्या सुविधांचा लाभ घेताना तुम्हाला अनेक ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड आणि लायसन्स लिंक केले नसेल तर खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही ते त्वरीत लिंक करु शकता. (Aadhaar Card Update: Face Authentication फीचरचा वापर करून uidai.gov.in वरून आधार कार्ड डाऊनलोड कसं कराल?)

आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे:

# तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी राज्याच्या परिवहन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळा https://parivahan.gov.in ला भेट द्या.

# वेबसाईटवरील 'Link Aadhaar' या ऑप्शनवर क्लिक करा.

# त्यानंतर ड्रापडाऊनमध्ये जाऊन 'Driving License' हा पर्याय निवडा.

# इथे तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर विचारला जाईल तो टाईप करा.

# ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाईप केल्यानंतर  'Get Details' या पर्यायावर क्लिक करा.

# त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर एन्टर करा.

# त्यानंतर 'Submit' क्लिक करा.

# तुमच्या मोबाईलवर आलेल्या OTP ने तुमचा आधार नंबर व्हेरिफाय करा.

# ओटीपी एन्टर केल्यानंतर तुमचे आधार आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याची प्रक्रीया पूर्ण होईल.

आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करणे बंधनकारक असल्याचा निर्णय केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वीच घेतला आहे. जर तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डसोबत लिंक केले नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्सचे रिन्यूअल, ड्रायव्हिंग लायसन्स मधील पत्ता अपडेट करणे, लर्नर लायसन्ससाठी अप्लाय करणे अशा सुविधांचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा. त्यामुळे तुम्हाला या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. ड्रायव्हिंग लायसन्सचे व्हेरिफिकेशन्स करण्यासाठी आधार कार्ड आता बंधनकारक केले आहे.