आता आधार सेवा mAadhaar App वर देखील मिळणार आहेत. पण त्याच्या सुरक्षिततेसाठी युजर्सना 4 अंकी सिक्युरिटी पासकोड देखील ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा पासकोड तुम्हांला आधार शी निगडीत कोणत्याही सेवांचा लाभ घ्यायचा असल्यास mAadhaar App वर देणं आवश्यक असेल. आधार हा 12 अंकी UIDAI कडून दिला जाणारा आयडेंटिफिकेशन नंबर आहे. नुकतच त्यांच्याकडून युजर्सना नव्या सुविधेची माहिती देताना 4 अंकी डिजिट पासकोडची माहिती देण्यात आली आहे.
UIDAI ने ट्वीट करत आधार लॉक/अनलॉक, बायोमेट्रिक लॉक, अनलॉक, VID generator, eKYC साठी असेल. त्यासाठी mAadhaarApp डाऊनलोड करा आणि इंस्टॉल करून त्याचा फायदा घ्या असं म्हटलं आहे.
ट्वीट
Set a 4-digit passcode for your #mAadhaar app. This passcode will be required if you use any services related to the selected Aadhaar profile like Aadhaar Lock/ Unlock, Biometric Lock/ Unlock, VID generator, eKYC etc. Download and install the #mAadhaarApp https://t.co/62MEOeR7Ff pic.twitter.com/eYkrxrgb34
— Aadhaar (@UIDAI) June 11, 2021
तुम्हांला 4 डिजिट पासकोड तयार करायचा असल्यास mAadhaarApp वर 'Register My Aadhaar'वर क्लिक करून 4 डिजिट पासकोड सेट करता येईल. mAadhaar App हे Android आणि iPhones दोन्हींसाठी उपलब्ध आहे. ते तुम्ही डाऊनलोड करून इंस्टॉल केल्यानंतर काही अटी शर्थींची यादी येईल ती वाचा आणि स्वीकारा. त्यानंतर तुम्हांला भाषा निवडता येईल. पुढे तुमचा मोबाईल नंबर टाका. नंतर ओटीपी येईल तो व्हॅलिडेट करा. तुमची ही सारी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही mAadhaar App वर आधारशी निगडीत कोणतीही सेवा वापरु शकता. Aadhaar Services on mAadhaar App: आधार कार्ड संबंधित 35 सुविधा मिळणार 'या' मोबाईल अॅपवर, पहा कसे कराल डाउनलोड.
mAadhaar app भारतामध्ये कोठूनही केव्हाही वापरता येऊ शकते. mAadhaar profile आता व्हॅलिड आयडी म्हणून विमानतळ, रेल्वे मध्ये स्वीकरले जाणार आहे.