7th CPC Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि पेन्शनधारकांचा महागाई मदत (Dearness Relief) 1 जुलैपासून 28 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मूळ वेतन (Basic Salary) आणि पेन्शनच्या (Pension) 11 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. 14 जुलै रोजी यावर निर्णय झाल्यानंतर यासंदर्भातील आदेश मोदी सरकारने जारी केले आहेत. महागाई भत्तामध्ये केलेली ही वाढ केंद्र सरकारी, पेन्शनधारक आणि कुटुंब पेन्शनधारक यांना लागू होणार आहे. यामध्ये केंद्र सरकारद्वारे जाहीर केलेल्या पेन्शनधारकांचा समावेश आहे.
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयानुसार, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना (सशस्त्र सेना, अखिल भारतीय सेवा आणि रेल्वेच्या निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसह) महागाई सवलत 1 जुलै 2021 पासून मूळ पेन्शन आणि कौटुंबिक पेन्शनमध्ये (अतिरिक्त पेन्शन/कौटुंबिक पेन्शनसह) 28% वाढविण्यात आली आहे. याचा लाभ केंद्र सरकारच्या लाखो माजी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. (7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA मध्येही होणार वाढ)
DoPPW issued orders dated 22.07.2021 enhancing the Dearness Relief to pensioners/family pensioners of the Central Government w.e.f. 01.07.2021 to 28% of basic pension/family pension, representing an increase of 11% over the existing rate of 17%. pic.twitter.com/4AEkQoN1BO
— D/o Pension & Pensioners' Welfare , GoI (@DOPPW_India) July 22, 2021
कोविड-19 संकटामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता (डीए) आणि पेन्शनधारकांना मिळणारा डीआर फ्रिज करण्यात आला होता. 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून थकीत असलेला महागाई भत्त्याला स्थगिती मिळाली होती. परंतु, आता महागाई भत्त्यामध्ये 28 टक्के इतकी वाढ करण्यात आली असून लवकरच याचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे.