7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA नंतर HRA मध्येही होणार वाढ
Image For Representations (Photo Credits: Twitter/File)

7 व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) वेतन मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अजून एक खुशखबर आहे. महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढीच्या घोषणेनंतर आता घरभाडे भत्ता (House rent allowance) देखील वाढवण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून एचआरए मध्ये 1-3 टक्क्यांची वाढ होणार आहे. ही वाढ वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळी असेल. 1 जुलै पासून वाढणारा महागाई भत्त्यासोबत ही वाढ देखील झाली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला महागाई भत्ता 17 टक्क्यांवरुन 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. डीएनएच्या रिपोर्टनुसार, खर्च विभागाने 7 जुलै 2017 रोजी महागाई भत्ता 25 टक्क्यांच्या पुढे जाईल आणि घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होईल, असे आदेश जारी केले होते. 1 जुलै 2017 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बेसिक वेतनाच्या 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील बदलला जाईल. (7th Pay Commission Latest News Today: केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आता 28%; पहा त्यामुळे पगारात नेमकी कशी वाढ होणार?)

X क्लास शहरांमध्ये राहणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बेसिक पे च्या 27 टक्के एचआरए मिळेल, Y क्लास शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18% तर Z क्लास शहरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9 टक्के घरभाडे भत्ता मिळणार आहे. सध्या X शहरातील कर्मचाऱ्यांना 24 टक्के, Y शहरातील कर्मचाऱ्यांना 16 टक्के आणि Z शहरातील कर्मचाऱ्यांना 8 टक्के एचआरए मिळत होता.

ज्या शहरातील लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त आहे, अशी शहरं X क्लास कॅटेगरीत मोडतात. 5 ते 50 लाख लोकसंख्या असलेली शहरं Y क्लास कॅटेगरीत येतात. तर 5 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरं Z क्लास कॅटेगरीत मोडतात. जेव्हा महागाई भत्ता बेसिक पे च्या 50 टक्के होईल तेव्हा घरभाडे भत्ता हा जास्तीत जास्त 30 टक्केच होऊ शकतो.