कोरना व्हायरस (Coronavirus) संकट काळात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेंट्रल गवर्नमेंट इम्प्लॉई ग्रुप इंश्योरेंस स्कीम (CGEGIS) संदर्भात एक टेबल प्रसिद्ध केले आहे. या टेबलनुसार सेवानिवृत्त पर्यंत केंद्र सरकारचा कर्मचारी केंद्र सरकारच्या (Central Government) समूह विमा योजना (CGEGIS) मध्ये आपले योगदान देऊ शकतो.CGEGIS 1980 योजना विमा कव्हरेजसोबत येते. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी विशेष बचक कोष म्हणूनही काम करते. प्राप्त माहितीनुसार, एकूण योगदानामध्ये, तसेच अल्पगुंतवणूक भाग विमा कव्हरकडे जातो. जेणेकरुन हा भाग सेव्हींग फंडमध्ये जातो. कर्तव्यावर असताना जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर या योजनेतून संबंधीत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मोठी मदत देता यावी असा CGEGIS टेबलचा उद्देश आहे.
कर्मचाऱ्याच्या बचत खात्यात जमा झालेली रक्कम कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला दिली जाते. प्रत्येक तिमाहीमध्ये केंद्र सरकार CGEGIS टेबल प्रसिद्ध करते. ज्यामध्ये कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीवेळी त्याला किती रक्कम मिळू शकते हे दाखवलेले असते.(हेही वाचा,7th Pay Commission: 7 व्या सीपीसी अंतर्गत सर्व श्रेणीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळतात 'हे' महत्वपूर्ण भत्ते, जाणून घ्या नियम )
देशातील कोरना व्हायरस संक्रमन स्थिती विचारात घेऊन आतापर्यंत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पेन्शन, रजा, स्टीटी यांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या सर्व निर्णयाचा प्रभाव केंद्र सरकाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक रकमेवर पडताना दिसत आहे.