7th Pay Commission: कोरोनाचे संकट संपल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील आर्थिक वर्षात वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. तर जवळजवळ 50 लाख सरकारी कर्मचारी परिस्थिती सुधारल्यास महागाई भत्ता संबंधित मोठी घोषणा केली जाऊ शकते अशी आशा करत आहेत. याच दरम्यान आम्ही तुम्हाला सर्व श्रेणीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्त्यांसंदर्भात अधिक माहिती देणार आहोत.(7th Pay Commission: 7 वे वेतन आयोगाअंतर्गत लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार वाढीव पगार आणि अॅरियर्स)
देशभरातील सरकारी महाकामांमध्ये सातवे वेतन आयोग लागू करण्याच्या शिफारसीनंतर लाखो कर्मचाऱ्यांचे वेत आणि भत्त्यात वाढ झाली होती. याच अंतर्गत बाल शिक्षा भत्त्यासाठी 1500 रुपये प्रति महिना प्रति मुलासाठी देण्यात येत होते. परंतु त्यात आता वाढ केली असून 2250 रुपये प्रति मुल असे केले आहे. तसेच हॉस्टेल सब्सिडीसुद्धा 4500 रुपये प्रति महिना वाढवून 6750 रुपये कील आहे. बाल शिक्षा भत्ता हा कर्मचाऱ्यांना दोन मुलांसाठीच दिला जातो.
भत्त्यांसबंधित 7 व्या केंद्रीय वेतन आयोगासंबंधित सिफारिश केंद्र सरकारच्या 6 जुलै 2017 मधील प्रस्तावातील भारताच्या राजपत्रात प्रकाशित केली होती. यामध्ये दिव्यांग महिलांची देखभाल संबंधित विशेष भत्ता 1500 रुपये प्रति महिन्यावरुन 3000 रुपये प्रति महिना केला आहे. त्याचसोबत असैन्य लोकांसाठी उच्च योग्यता प्रोत्साहनाला 2000-10000 रुपये वाढवून 10000-30000 रुपये केले आहे.(7th Pay Commission: 7 व्या वेतन आयोगानुसार 'हे' 4 महत्वाचे बदल होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा होणार फायदा)
दरम्यान, मोदी सरकारने केंद्रात सत्ता आल्यानंतर सातव्या वेतन आयोग संबंधित सिफारिश लागू करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने जून 2017 मध्ये भत्त्यातील संशोधनाला मंजूरी दिली होती. तर हे संशोधन 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला.