
गुजरात सरकारने नुकत्याच लाखो पेन्शन धारकांना आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. गेल्या बुधवारी या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच आता 12 टक्क्यांवरुन 17 टक्के महागाई भत्ता मिळणार असून हा नियम येत्या 1 जुलै 2019 पासून लागू करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी नवे डीए जानेवारीच्या पगारासोबत मिळणार आहे. तर संबंधित अॅरियर्स दोन-तीन आठवड्यात देण्यात येणार आहे. पटेल यांच्या मते, अॅरियर्सच्या पैशांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीएनच्या अनुरुप मिळण्यासाठी घेतला आहे. डीएमध्ये वाढ केल्याने 1821 करोड रुपयांचा अतिरिक्त बोझा वाढणार आहे. या बदलावाचा लाभ पंचायत कर्मचाऱ्यांना सुद्धा देण्यात येणार आहे.केंद्रीय कर्मचार्यांसाठी सध्या फीटमेंट फॅक्टर 2.57 इतका आहे तर तो वाढवून आता 3.68 करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय कर्मचार्यांनी केली आहे. दरम्यान नव्या वर्षात केंद्रीय कर्मचार्यांवर पगारवाढीचं गिफ्ट मोदी सरकार देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. (7th Pay Commission: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकार देणार केंद्रीय कर्मचार्यांना पगारवाढीची गूडन्यूज; 'हा' मोठा निर्णय घेण्याची शक्यता)
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी पगारवाढीची खूषखबर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचार्यांसाठी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी यासाठी मागणी करत आहेत. सरकारने मागणी मान्य केल्यास 8000 रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. किमान वेतन वाढवण्यासोबतच आता सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.