Coronavirus (Photo Credits: Pixabay)

India's Daily COVID-19 Testing Capacity: भारताची दैनंदिन कोरोना चाचणी क्षमता 11.70 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 4,95,51,507 कोरोना चाचण्या घेण्यात असून गेल्या 24 तासांत 7,20,362 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याशिवाय देशभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्याने गेल्या 2 आठवड्यांत 1,33,33,904 चाचण्या घेण्यात आल्या. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

भारतात कोवीड 19 रूग्ण बरे होण्याचा चढता आलेख कायम आहे. आज बरे झालेल्या रूग्णसंख्येने आज 32.5 लाखाचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासांत 69,564 रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे रूग्णांचा बरे होण्याचा दर 77.31% इतका झाला आहे. (हेही वाचा -Coronavirus Recovery: देशात 32 लाखाहुन अधिक रुग्ण कोरोना मुक्त, रिकव्हरी रेट 77.31 टक्के- आरोग्य मंंत्रालय)

याशिवाय कोविड -19 बाधित रुग्णांचा मृत्यूदर 1.70% पर्यंत कमी झाला आहे. घरे आणि सुविधा केंद्रांमध्ये देखरेखीखाली विलगीकरण, तसेच खबरदारीच्या उपाययोजनांचा अवलंब केल्यामुळे सौम्य आणि मध्यम लक्षणे असणारे रूग्ण लवकर बरे होऊ शकले आहेत. देशातील एकूण रूग्णांपैकी 60% रूग्ण पाच राज्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 21.6%, आंध्र प्रदेशमध्ये 11.8%, तमीळनाडूमध्ये 11.0%, कर्नाटकमध्ये 9.5% तर उत्तर प्रदेशमध्ये 6.3% रूग्ण आहेत. देशातील एकूण सक्रिय रूग्णांपैकी 26.76% रूग्ण महाराष्ट्रातले आहेत.