भारतीय लष्काराकडून पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ उद्धवस्त
जम्मू -काश्मिर (Photo Credits-ANI)

पाकिस्ताने रविवारी सकाळी शस्त्रीसंधीचे उल्लंघन करुन भारतीय लष्करावर गोळीबार केला होता. यात 2 भारतीय सैनिक शहीद झाले असून एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत भारतीय लष्काराकडून पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद आणखी पेटल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने गेल्या आठवड्यात बारामुल्लामधील सीमा भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यामध्येही एक भारतीय जवान शहीद झाला होता.

रविवारी सकाळी पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्यांना मदत करणयासाठी भारताच्या दिशेने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये दोन जवान शहीद तर एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला.याव्यतिरिक्त इतर तीन गंभीर जखमी झाले आहे. एवढेच नव्हे तर, या गोळीबारात दोन घरे पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्काराकडून पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहे. हे देखील वाचा-जम्मू-कश्मीर: श्रीनगर येथे दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 7 जण गंभीर जखमी

एएनआय ट्विट-

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्करासह नागरिकही गंभीर जखमी झाले आहे. या गोळीबारातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.