PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 74 व्या स्वातंत्र दिनानिमित्त लाल किल्यावरून तिरंगा फडकवणार आहेत. यासाठी लाल किल्ल्यावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. कोरोनामुळे यावर्षी परिस्थीती बदलली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आपल्या भाषणात आगामी आव्हानांबाबत काय घोषणा करतात? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन कोरोना महामारीचा छायेत होत असल्याने या क्रार्यक्रमावर मर्यादा असल्या तरी डिजीटल माध्यमाद्वारे पंतप्रधानांचे भाषण पाकिस्तान आणि चीनसह देशभरात पोहचणार आहे. तसेच नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेबद्दल काय बोलतात? याकडे सगळ्या जनतेचे लक्ष लागले आहे.

देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून आतापर्यंत एकूण 14 वे पंतप्रधान झाले आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे. नरेंद्र मोदी हे दिर्घकाळापर्यंत राहणारे देशाचे चौथे पंतप्रधान बनले आहेत. याआधी हा विक्रम भाजप नेते अटल बिहारी यांच्या नावावर होता. तसेच सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचा मान मिळवणारे ते पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान ठरणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा काँग्रेस आघाडीला धूळ चारून लोकसभेत घवघवीत बहुमत मिळवले होते. कोरोना संकटाचा काळात नरेंद्र मोदीचे भाषण तुम्हाला दूरदर्शन किंवा युट्यूबला पाहता येणार आहे. हे देखील वाचा- Independence Day 2020: स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई महापालिकेचे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई

येथे पाहा लाईव्ह-

स्वातंत्र्यदिन सोहळ्यानंतर संध्याकाली राष्ट्रपती भवनामध्ये अॅटोहोम हा कार्यक्रम आयोजिण्यात येतो. पण यंदा त्यावरही कोरोनाचे सावट आहे. तिथे 1 हजार 500 एवजी फक्त 100 पाहुण्यांनाच बोलाविण्यात आले. अडीच तासाच्या या कार्यक्रमाची वेळ आता दीड तासांवर आणण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, या सोहळ्यात 10 प्रमुख मंत्री, 10 प्रमुख देशांचे राजदूत व सरन्यायाधीश, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच काही न्यायाधीश सहभागी होणार आहेत.