स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येपासूनच राजधानी दिल्ली प्रमाणेच मुंबईत (Mumbai) देखील भारतीयांचा उत्साह पहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे मुख्यालय (Brihanmumbai Municipal Corporation Building), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) ऐतिहासिक वास्तू तिरंग्याच्या रंगात नाहून निघाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या या दोन्ही वास्तू स्वातंत्र्य दिनानिमित्त हजारो दिव्यांनी उजळून गेले आहे. तिरंगी रोषणाई पाहण्यासाठी दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर प्रंचड गर्दी पाहायला मिळते. तसेच या नयनरम्य दृष्याला दरवर्षी काहीजण डोळ्याते तर, काहीजण आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. मात्र, यावर्षी संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वावरत असल्यामुळे अनेक नागरिक स्वातंत्र्य दिन आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करत आहेत.

ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्य दिवस हा भारतातील नागरिकांसाठी एक राष्ट्रीय सण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशातील असंख्य हुतात्म्यांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यानंतर तब्बल 150 वर्षानंतर भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले आहे. या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या क्रांतिकारकाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले जाते. हे देखील वाचा- Independence Day 2020 Special Mehndi Designs: स्वातंत्र्य दिना निमित्त आपल्या हातावर Tricolour मेहंदीच्या या लेटेस्ट डिझाईन्स काढून साजरा करा 15 ऑगस्ट (Watch Videos)

एएनआयचे ट्वीट-

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर येथेही तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनानिमित्त स्क्वेअरवर तिरंगा फडकवला जाणार आहे. तसेच 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन पार पडल्यानंतर अमिरेकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला होता.