स्वतंत्रता दिवस 2020 मेहंदी डिझाइन (Photo Credits: Instagram)

Independence Day 2020 Mehndi Designs:  भारतीय संस्कृतीतल्या कोणत्याही महत्त्वाच्या सणाची किंवा उत्सवाची शुभता वाढवण्यासाठी महिला आणि मुली आपल्या हातावर मेहंदी काढतात. सर्व धार्मिक सणांदरम्यान मेहंदी (Mehndi) काढणे हा शतकानुशतके आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत जेव्हा स्वातंत्र्यदिन साजरा (Independence Day) करण्याचा विषय असतो तेव्हा स्त्रिया त्यांच्या हातावर मेहंदी कशा नाही काढणार? स्वातंत्र्य दिन हा फक्त एक राष्ट्रीय सण नसून आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी सुमारे 200 वर्षांनंतर ब्रिटिशांच्या गुलामगिरीपासून (British Rule) भारत स्वतंत्र झाला. यावर्षी, भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल अशा परिस्थितीत लोकांचा उत्साहही शिगेला पोहचला आहे. कोरोनामुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रम होत नसले तरी महिला आणि मुली 15 ऑगस्ट रोजी, तिरंग्याची सुंदर मेहंदी हातावर काढून आपण आपल्या देशभक्तीच्या भावना व्यक्त करू शकता. (Independence Day 2020 Special Tricolour Menu: सॅन्डव्हिच ते पुडिंग च्या माध्यमातून तिरंगा मेजवानीचा आस्वाद घेत साजरा करा 74 वा भारतीय स्वातंत्र्यदिन)

या दिवशी, आपण मेहंदीच्या माध्यमातून तिरंगा (राष्ट्रीय ध्वज), मोर (भारतीय पक्षी), ताजमहाल, लाल किल्ला आणि कुतुब मीनार यासारख्या महान ऐतिहासिक वास्तूसारख्या मेहंदी डिझाईन्स स्वतंत्रदिनानिमित्त काढू शकता. या खास प्रसंगी आम्ही स्वातंत्र्यदिनानिमित्त खास मेहंदी डिझाईन्स घेऊन आलो आहेत, ज्या तुम्ही तुमच्या हातांवर काढू शकता. भारतात मुली आणि स्त्रिया वेगवेगळ्या खास प्रसंगी सुलभ, आकर्षक मेहंदी डिझाइनसह आपले हात सजवतात. हे पवित्र तसेच सुंदर मानले जाते. या 2020 स्वातंत्र्य दिनी लागू करण्यासाठी साध्या मेहंदी नमुन्यांची आणि डिझाइनची काही व्हिडिओ ट्यूटोरियल येथे पाहा:

भारतीय ध्वज मेहंदी डिझाइन

सुलभ आणि सुंदर मेहंदी डिझाइन

स्वातंत्र्यदिन मेहंदी डिझाइन

सुलभ स्वातंत्र्यदिन मेहंदी डिझाइन

स्वातंत्र्य दिनाचे हे काही DIY नमुने आहेत, परंतु आपण त्यात आपली सर्जनशीलता देखील दर्शवू शकता. आपली क्रिएटिव्हिटी जोडून आपण आपल्या आवडीनुसार मेहंदीची रचना आणखी सुंदर बनवू शकता. मेहंदीच्या आकर्षक डिझाइनशिवाय आपण पांढरे, केशरी आणि हिरवे कपडे घालू शकता, त्याशिवाय आपल्या घरी ट्राय कलर रेसिपी बनवण्याबरोबरच तुम्ही हा दिवस कुटुंबासमवेत खास बनवू शकता. आपणा सर्वांना 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!