Two groups opened fire In Panjab (PC - X/@mssirsa)

Punjab Shocker: पंजाब (Punjab) मधील गुरुदासपूर जिल्ह्यात (Gurdaspur District) जुन्या वैमनस्यातून दोन पक्षांनी एकमेकांवर गोळीबार (Fire) केला, त्यात चार जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारात दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या वेळी दोन्ही बाजूचे एकूण 13 जण घटनास्थळी उपस्थित होते. बटाला येथील विठवन गावात रविवारी रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारात आठ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेवरून पंजाबमध्येही राजकारण सुरू झाले आहे. या घटनेबाबत भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी पंजाबच्या भगवंत मान सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ही क्रूर घटना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आप सरकारचे आणखी एक अपयश अधोरेखित करते. (हेही वाचा - CCTV- Bengaluru ATM Theft: बेंगलूरू मध्ये एटीएम मध्ये चोरी पूर्वी चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर मारला स्प्रे पेंट; तरीही चोरी कॅमेर्‍यात कैद ( Watch Video))

सिरसा यांनी X वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'बटाळा येथील विठवण गावात प्रतिस्पर्धी गटांमध्ये सुरू असलेल्या भांडणातून चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही क्रूर घटना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आप सरकारचे आणखी एक अपयश अधोरेखित करते. आम आदमी पक्ष सत्तेत आल्यापासून पंजाब ही कुणाची भूमी झाली नाही. अखेर कारवाई होण्यापूर्वी आणखी किती जीव गमवावे लागतील?' असा सवाल सिरसा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना विचारला आहे.