Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमद (Atik Ahmed) खून प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने दोन मोबाईल जप्त केले आहेत. सुरुवातीला आत्मसमर्पण करताना या तिघांकडून मोबाईल सापडले नाहीत. तेथून पोलिसांना संशय आला की हे तिघे मोबाईलशिवाय कसे संपर्कात होते? चौकशीत तिघांनीही हे मोबाईल हॉटेलमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. आता मोबाईल फोन आणि त्यांचे जुने नंबर सापडले आहेत. या क्रमांकांचे कॉल डिटेल्स काढले जात आहेत. त्यामुळे त्यांचा हँडलर आणि हत्येचा मास्टरमाइंड उघड होईल, अशी आशा पोलिसांना आहे.
या तिन्ही आरोपींची एसआयटीची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान या आरोपींनी सांगितले की, ते प्रयागराजमधील रेल्वे स्टेशन आणि खुलदाबाद पोलिस स्टेशनच्या दरम्यान असलेल्या हॉटेलमध्ये राहत होते. प्लॅननुसार तिघांनीही मोबाईलमधून सिम काढून फेकून दिले होते. हत्येनंतर तिन्ही शूटर्सना हॉटेल गाठावे लागले आणि सामान घेऊन फरार झाले. (हेही वाचा - Poonch Terror Attack: शहीद लान्स नाईक देवाशिष बसवाल यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत, ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची घोषणा)
अतिक आणि अश्रफ यांची रेकी करण्यासाठी ते ई-रिक्षाने जात होते, असे शूटर्सनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या चौकशीत त्यांचे नंबर सापडले आहेत. पोलिस आरोपींच्या क्रमांकाचा सीडीआर काढून त्यांच्या संवादाचा डेटा तयार करत आहेत. त्यामुळे या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या किंवा या संपूर्ण हत्येचे सूत्रधार असलेल्या लोकांपर्यंतही पोलीस पोहोचू शकतात.
दुसरीकडे, उमेश पालच्या हत्येपूर्वी बंद करण्यात आलेला व्हॉट्सअॅप ग्रुपही पोलिसांना सापडला आहे. हा ग्रूप असद अहमद चालवत होता. या गटाचे नाव शेर-ए-अतीक होते आणि त्यात 200 लोक होते. आता हे 200 नंबर चालवणारे लोकही अतिकच्या रडारवर आहेत. या ग्रुपमध्ये प्रयागराज, कौशांबी आणि फतेहपूर येथील सुमारे 200 तरुणांचा समावेश होता.