पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने 26 फेब्रुवारी रोजी सर्जिकल स्ट्राईक (Surgical strike) करून बालाकोट (Balakot) येथील जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad)चे दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. यावेळी अनेक दहशतवादी ठार झाले असे भारत्कडून सांगण्यात आले होते, मात्र त्याबाबत कोणताही पुरावा सादर केला गेले नव्हता. आत या हल्ल्यात मदरसा तालीम-उल-कुराण (Madrasa Taleem-ul-Quran) च्या चार इमारतींचे नुकसान झाले असल्याचा पुरावा गुप्तचर यंत्रणांकडे सिथेंटिक अपर्चर रडारच्या (SAR) सहाय्याने घेण्यात आलेले फोटोद्वारे मांडण्यात आला आहे. या फोटोंमध्ये टार्गेट करण्यात आलेल्या चार इमारतींना मिराज 2000 ने पाच S-2000 प्रिसिजन गायडेड म्युनिशन (PGM) च्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याचे दिसत आहे.
'द इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबत वृत्त दिले आहे. भारताने हल्ला केला मात्र तिथे दहशतवादी तळ होते ही गोष्ट पाकिस्तानने मान्य केली नाही. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय अधिकाऱ्यांकडे SAR च्या सहाय्याने घेण्यात आलेले फोटो आहेत. ज्या ठिकाणी हल्ला केला तिथे एक इमारत गेस्ट हाऊसप्रमाणे वापरली जात होती. मौलाना मसूद अझहरचा भाऊ त्या कागेत राहत होता. एक एल आकाराची इमारत होती जिथे प्रशिक्षण घेणारे दहशतवादी राहत होते. जैशचा प्रशिक्षण तळ आणि त्यातील मदरसा लिम-उल कुरान याचाही यात समावेश आहे. (हेही वाचा: तिनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पाकिस्तानच्या खोटेपणाचे पुरावे)
या सर्व इमारतींनी बॉम्बने टार्गेट करत उद्ध्वस्त करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने हल्ल्यात इस्त्राइल बनावटीच्या बॉम्बचा वापर केला होता. पुराव्यादाखल असलेले हे फोटो भारत सरकारच्या परवानगीनंतरच सार्वजनिक करण्यात येतील. हल्ला झालेले ठिकाण हे निर्मनुष्य जागी होते जे आता पाकिस्तानने सील करून टाकले आहे. त्यामुळे मृतांचा एकून आकडा मिळणे थोडे अवघड आहे.