Nirmala Sitharaman On Lok Sabha Election: निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत; निर्मला सीतारामन यांचा लोकसभेची उमेदवारी नाकारत निवडणूक लढवण्यास नकार
Nirmala Sitharaman (PC - ANI)

Nirmala Sitharaman On Lok Sabha Election: लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी (Lok Sabha Election 2024) पुरेसा पैसा नसल्यामुळे निवडणूक लढवण्याचा भाजपचा (BJP) प्रस्ताव नाकारला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सांगितले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूतून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. मात्र, दहा दिवस विचार करून मी त्यांना नकार दिला. कारण, माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी एवढे पैसे नाहीत, असं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे.

मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. त्यांनी माझी विनंती मान्य केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की देशाच्या अर्थमंत्र्यांकडे निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा निधी का नाही? यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, भारताचा एकत्रित निधी हा त्यांचा वैयक्तिक निधी नाही. माझा पगार, माझी कमाई आणि माझी बचत माझी आहे, भारताचा संचित निधी माझा नाही. टाइम्स नाऊ समिट या टीव्ही चॅनलच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (हेही वाचा -MP Ganesamoorthy Passes Away: लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या Ganesamoorthy यांचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन)

यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या इलेक्टोरल बाँड्सच्या विरोधात निकाल देताना निवडणूक निधीसाठी अधिक चांगली व्यवस्था आणण्यासाठी अधिक चर्चेची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला कायदा संसदेने मंजूर केला होता आणि त्यावेळी प्रचलित कायद्यानुसार रोखे खरेदी केले गेले होते. जो पक्ष आता या प्रकरणात घोटाळा झाल्याचं बोलत आहे. त्याच पक्षाने बाँडद्वारे पैसेही घेतले होते. (नक्की वाचा: Amravati Lok Sabha Election: भाजपकडून अमरावतीतून नवनीत राणाला उमेदवारी जाहीर, बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष.)

19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने अनेक विद्यमान राज्यसभा सदस्यांना उमेदवारी दिली. यामध्ये पीयूष गोयल, भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर, मनसुख मांडविया आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे. सुश्री सीतारामन या कर्नाटकच्या राज्यसभा सदस्य आहेत.