हैदराबादच्या (Hyderabad) खैरताबाद येथील गणेश मूर्तीच्या उंचीत अधिक वाढ केली आहे. गेल्या वर्षी या गणेश मूर्तीची उंची ६० फुट होती. मात्र यंदाच्या वर्षी या मूर्तीत आणखी १ फुटाची वाढ करण्यात आली आहे. हैदराबाद येथील ही गणेश मूर्ती उंचीमुळे संपूर्ण भारतात ( India) प्रसिद्ध आहे. महागणपतीच्या अवतारात ही मूर्ती घडवली जाते. हैदराबाद येथील हवामान चांगले राख आणि शेतीसाठी पुरेसा पाऊस होऊदे, अशी मागणी या विशाल गणेश मूर्तीकडे केली जाते.
गणेश उत्सव समितीचे संस्थापक, सिंगरी सुदर्शन मूदिराज (Singari Sudershan Mudiraj) यांचा भाऊ समाजसेवक एस. शंकरार्य (S Shankaraiya) यांनी १९५४ साली मंडळाची स्थापना केली होती. त्यावेळी गणेश मूर्तीची उंची केवळ १ फुट होती. काही काळानंतर या मूर्तीच्या उंचीत वाढ होत गेली. २०१४ मध्ये या गणेश मूर्तीची उंची ६० फुटापर्यंत पोहचली होती. हैदराबाद येथील विशाल गणेश मूर्तीची उंची कमी करण्याचा विचार करत होतो. परंतु, यंदाच्या वर्षी मूर्तीची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला, असे मूदिराज म्हणाले. हे देखील वाचा-Ganeshotsav 2019: असं असेल तर मग गणपती आरती म्हणूच नका! थेट रेकॉर्डच लावा ना
ही विशाल मूर्ती घडवण्यासाठी १५० कामगार आणि ४ महिन्याचा काळ लागला आहे. तसेच ही मूर्ती घडवण्यासाठी १ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे, मूदिराज यांनी सांगितले. तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील कारागिरांना ही मूर्तीसाठी घडवण्यासाठी बोलवण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, कारागिरांनी वेळेत ही मूर्ती तयार केली. यामुळे मूदिराज यांनी कारागिरांचे मनापासून आभार मानले. या विशाल मूर्तीचे वजन जवळपास ५० टन इतके आहे. या मूर्तीला १२ मूख आणि २४ हात देण्यात आले आहे. प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र देण्यात आले आहे. तसेच मूर्तीच्या बाजूस ७ घोडे दर्शवले गेले आहेत. यावर्षी ३ सप्टेंबर रोजी गणेश मूर्तीची स्थापना केली जाणार आहे.