ओशिवरा परिसरात 19 वर्षीय तरुणी नाल्यात पडली; 18 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्र
टीम लेटेस्टली
|
Feb 18, 2020 11:49 PM IST
महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वीची परीक्षा आज (18 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. अनेकांच्या करियरला टर्निंग पॉईंट ठरणारी ही परीक्षा राज्यभरात 9 विविध जिल्हानिहाय शिक्षण मंडळांकडून एकाच वेळी घेतली जाणार आहे. दरम्यान यंदा बारावीची परीक्षेला सामोरे जाणार्यांची संख्या 15 लाख 5 हजार 27 इतकी आहे. दरम्यान यामध्ये 8,43,553 मुलं तर 6,61,325 मुलींचा समावेश असून राज्यात एकून 3036 परीक्षा केंद्रावर आजपासून परीक्षेला सुरूवात होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारपासून कोकण दौर्यावर आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे रत्नागिरी मधील नाणार रिफायनरी प्रकल्पासोबतच महत्त्वाच्या विकासप्रकल्पांचा आढावा घेत आहेत. रायगड,रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ते भेट देणार आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. शिवसेनेही त्यांना पाठिंबा देत प्रकल्पाविरोधी भूमिका घेतली होती. मात्र, आता पुढील विकासप्रकल्पासाठी आज मुख्यमंत्री स्थानिकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी17 फेब्रुवारी सोमवार राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 24 फेब्रुवारीपासून सुरु होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारचा कारभार तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपा, काँग्रेस समवेत इतर पक्षांचे 51 खासदार एप्रिल महिन्यात राज्यसभेतून सेवानिवृत्त होतील. भाजपला अजूनही राज्यसभेत बहुमत नसल्याने एप्रिल मध्ये होणाऱ्या निवडणूक भाजप पक्षासाठी महत्त्वाची आहे. राज्यसभेत सध्या 245 खासदार आहेत. खासदार निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्राला 7 जागा मिळतील
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
जपानच्या सरकारने डायमंड प्रिसेंस क्रुजवर अडकेल्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संक्रामित झालेल्या नागरिकांना 2 हजार आयफोनचे वाटप केले आहे. हे जहाज कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर जपानच्या तटावर थांबण्यात आली आहे. वाटप करण्यात आलेल्या आयफोनमध्ये प्री-इन्स्टॉल लाइन अॅप देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना मॅसेजच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधत कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सल्ला घेऊ शकतात. नागरिक जपान मधील चिकित्सक तज्ञांसोबत बातचीत करु शकतात. रिपोर्टच्या मते, जहाजाचे चालक आणि नागरिकांना प्रत्येक केबिन मध्ये कमीत कमी एक फोनची सोय करुन देण्यात आली आहे. डायमंड प्रिंसेस क्रुजवर जवळजवळ 3700 नागरिक अडकले आहेत. यामधील 6 जण हे भारतीय नागरिक आहेत. जहाजात क्रूचे 1100 सदस्य असून त्यापैकी 132 भारतीय आहेत. क्रूझमध्ये कोरोना व्हायरसची लागण 350 लोकांना झाली आहे.