Himachal Pradesh Wedding: बर्फाळ प्रदेशात पार पडला लग्न सोहळा, पाहा व्हायरल Video
Himachal Pradesh Wedding Viral Video PC TWitter

Himachal Pradesh Wedding: लग्नाचा दिवस खास बनवण्यासाठी सद्या ट्रेंड चालू आहे तो डेस्टिंनेशन वेडिंगचा.आता लग्नाचा सीजन असल्यामुळे सोशळ मीडियावर वेगवेगळे लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात लग्नासाठी कपल्स हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीच्या बर्फाळ प्रदेशात लग्न सोहळा करत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर वधू -25 डिग्री तापमानात विवाह बंधनात अडकले आहे.  हे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्यांचा धक्काच बसला आहे. हेही वाचा- अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टार 'रिहाना'चे जामनगर येथे आगमन;

 

View this post on Instagram

 

A post shared by Sach Kadwa Hai (@sachkadwahai)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, आजूबाजूला बर्फाची चादर पसरली आहे. हा नजरा नयनरम्य आहे. लग्न मंडपात हिंदी संस्कृती प्रमाणे कडाक्याच्या थंडीत वर वधू लग्न बंधनात अडकले आहे.हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @ sachkadwahai या अकाउंटने पोस्ट केला आहे. हा अनोखा विवाह सोहळा पाहून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे कपल्स गुजरात येथील असल्याचे समजत आहेत. लग्न समारंभ झाल्यानंतर वर वधू फुलांच्या सजलेल्या कारमध्ये बसून पोज देत फोटो काढत आहे. हे डेस्टिंनेशन वेडिंग अनोखा विवाह सोहळा म्हणून ओळखला जाईल अशी नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.या व्हिडिओला 24,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर दुसऱ्याला 8,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.