हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील अंधश्रद्धेबबात एक विचित्र प्रकार घडला आहे. या प्रकरणातील मुलाने मृत पावलेल्या वडिलांच्या आत्म्याला बोलवण्यासाठी आपल्या तीन मित्रांसह नग्न डान्स केल्याचे समोर आले आहे.तर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक केली आहे.
ऊना येथील दौलतपुरामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या गावात सोमवारी मृत पावलेल्या व्यक्तीची पूजा करण्यात आली होती. त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या आरोपीने रात्री एका देवीच्या मंदिरा नजीक एका ठिकाणी बसून मित्रांसह जेवण आणि मद्यपान केले. मात्र अचानक मद्याच्या नशेतील मुलाने मृत पावलेल्या वडिलांच्या आत्म्याल बोलवण्यासाठी आपले सर्व कपडे काढून नाच करण्यास सुरुवात केली. त्याचे अनुकरण करत त्याच्या मित्रांनीसुद्धा नग्न होऊन नाचण्यास सुरुवात केली. यावेळी तेथील एका व्यक्तीने या चार जणांना हे कृत्य करताना अडवले असता नग्न होऊन आम्ही मृत पावलेल्या वडिलांच्या आत्म्यास बोलावण्याचा प्रयत्न करत आहोत असे सांगितले. त्यामुळे गावातील लोकांनी यांच्या अश्या वागण्यामुळे पोलिसात तक्रार केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी घटनास्थळी पोहचून या चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर या चार जणांची रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.