हेरॉईन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक
फोटो सौजन्य - गुगल

मणिपूर येथून ट्रकमध्ये लपवून 100 करोड रुपये किंमत असलेल्या हेरॉईन या ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर निलेश अलोतिया हा मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सईद खान आणि घनश्याम ही आरोपींची नावे आहेत. तर हे दोघे राजू नावाच्या एक ट्रक चालकाशी मिळून हेरॉईन या ड्रग्जचा पुरवठा करतात. पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 ऑक्टोंबर रोजी मणिपूर येथून एक ट्र्क मोठ्या प्रमाणात हेरॉईनची तस्करी करत असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी कट रचून या प्रकरणातील आरोपींना दिल्ली येथे अटक केली आहे. तर ट्रकमधील सामानाची पाहाणी केली असता त्यात 25 किलो हेरॉईन ड्रग्ज असल्याचे सापडले. तसेच जप्त केलेल्या या हेरॉईन ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 100 करोड रुपये असल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणापूर्वी ऑक्टोंबर महिन्यातच ड्र्ग्जची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तर दिल्लीमध्ये दिवसेंदिवस ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.