Photo Credit- Pixabay

Gujarat Shocker: गुजरातमधील सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने तिचे अर्भक नाल्यात फेकूण दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी अल्पवयीन ( minor girl) असून तिची इंस्टाग्रामवर ( minor girl)एका 17 वर्षांच्या मुलाशी मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांनी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, मुलगी गर्भवती राहिल्यावर मुलाने तिला गर्भपातासाठी गोळ्या दिल्या. मुलीचा घरीच गर्भपात झाला. त्याने गर्भ एका नाल्याजवळ फेकून(girl throws foetus) दिला. पक्षी गर्भाजवळ घिरट्या घालत होते. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.(Prayagraj: प्रवाशांकडून रेल्वेच्या चादरी चोरण्याचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी पकडले रंगेहाथ, सामानात लपवल्या बेडशीट (Video))

ही घटना 9 जानेवारी रोजी सुरतमध्ये घडल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. 9 जानेवारी रोजी अपेक्षानगर परिसरात काही मुले खेळत होती. मग त्याची नजर नाल्याजवळ घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांवर पडली. मुलांनी दगडफेक करून पक्ष्यांना हाकलून लावले. त्यानंतर ते जवळ गेल्यावर त्यांना एक गर्भ आढळला. मुलांनी पोलिसांना पाचारण बोलावले. गर्भ एका मुलीचा होता. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर हल्ला करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर; विजय दास या खोट्या नावाचा वापर)

गर्भ सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर संशय आला. मुलीला नवीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे निश्चित केले. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासानंतर असे आढळून आले की मुलगी 16 वर्षांची होती आणि 3 जानेवारीपर्यंत ती शाळेतही गेली होती.

पोलिस तपासात असेही आढळून आले की, त्यांची इंस्टाग्रामवर मैत्री झाली आणि नंतर त्यांचे नाते निर्माण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा सुरतमधील पांडेसरा येथे भाड्याच्या घरात राहत होता. मुलगी गर्भवती असल्याची माहिती मिळताच, मुलगा उत्तर प्रदेश आणि नंतर मुंबईला पळून गेला, असे पोलिसांनी सांगितले. "मुंबईतील मुलाने तिला गर्भपात करण्यासाठी गोळ्यांचे पॅकेट पाठवले. तिने दोन गोळ्या खाल्ल्या आणि घरीच गर्भपात केला. नंतर तिने अर्भक फेकून दिला".