New Guidelines For Media Production Industry: टीव्ही, चित्रपटाच्या शुटिंगसाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
Prakash Javdekar | Photo Credits: Twitter/ ANI

New Guidelines For Media Production Industry: केंद्र सरकारने टीव्ही आणि चित्रपटाच्या शुटिंगसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांनी माहिती दिली आहे. या मार्गदर्शक सुचनानुसार, शुटिंगच्या ठिकाणी फेस मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. तसेच शुटिंग दरम्यान, सीटिंग, कॅटरिंग, क्रू पोझिशन्स, कॅमेरा लोकेशनमध्ये योग्य ते अंतर राखणं आवश्यक असणार आहे. याशिवाय रेकॉर्डिंग स्टूडिओ, एडिटिंग रूमध्येही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

नवीन मार्गदर्शक सुचनानुसार, कॅमेऱ्यासमोरील कलाकार यांना सोडून सर्वांसाठी फेस मास्क अनिवार्य असणार आहे. तसेच शुटींगच्या ठिकाणी 6 फुटांच्या अंतराचे पालन करावे लागणार आहे. याशिवाय मेकअप आर्टिस्ट, हेयर स्टायलिस्ट्सला पीपीई किटचा वापर करावा लागणार आहे. (हेही वाचा - Coronavirus in India: कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने ओलांडला 30 लाखांचा टप्पा; 69,239 नव्या रुग्णांच्या मोठ्या भरीसह 912 जणांचा मृत्यू)

दरम्यान, शुटींगवेळी शेअर करण्याजोग्या वस्तूंचा वापर करताना ग्लोव्ह्ज घालणं आवश्यक असणार आहे. शुटींगच्या वेळी प्रॉप्सचा वापर कमीतकमी व्हावा. तसेच वापरानंतर सॅनिटायझेशन आवश्यक असणार आहे. शूटिंगवेळी कास्ट अॅण्ड क्रू कमीतकमी असावे. शूट लोकेशनवर एंट्री आणि एग्झिटचे वेगवेगळे मार्ग असावेत. याशिवाय व्हिजिटर्स आणि दर्शकांना सेटवर जाण्याची परवानगी नाही, असंही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.