Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. सोने प्रतितोळा 816 रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सोन्याचा आज भाव प्रतितोळा 49 हजार 430 वर गेला आहे. विशेष म्हणजे, वायदे बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. यापूर्वी सोमवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यामुळे वायदा बाजारात सोन्याचे दर वाढले, असे मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन, अनलॉकिंगनंतर उर्वरित बाजारात व्यापार काहीसे ठप्प झाले होते. दरम्यान, आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याने भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आल्याचे पाहायला मिळाले होते. दिवाळीनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याचा भावात वाढ झाल्याचे कळत आहे. हे देखील वाचा-Indian Economy: पुढील वर्षी भारतीय कंपन्यांसाठी व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील; Moody's ने वर्तवले सकारात्मक भविष्य
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.
सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही डिजिटल सोन्यात देखील गुंतवणूक करु शकता. हा देखील गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे डिजिटल किंवा पेपर गोल्ड ही एका प्रकारची गुंतवणूक असून गरजेच्या काळी तुम्ही याची विक्री करु शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी 1 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता.