
लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात गगनाला भिडलेल्या सोन्याच्या भावात (Gold Rate) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याच्या किंमतीत महिन्याभरात तब्बल 1800 रुपयांनी घट झाली आहे. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव तब्बल 760 रुपयांनी कमी झाला आहे. ज्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सोन्याता येत्या काही महिन्यात 60 हजारांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याने सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
गुड रिटर्न या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज (रविवारी, 28) 24 कॅरेट सोन्याचा भाव 44 हजार प्रति तोळ्यावर आला आहे. तर, 22 कॅरेटचे सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांना प्रति तोळा 43 हजार मोजावे लागणार आहे. देशात पुन्हा कोरोना संकटाने डोके वर काढले आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- East Central Railway Recruitment 2021: ईस्ट सेंट्रल रेल्वेत नोकर भरती, येत्या 30 एप्रिल पर्यंत करता येणार अर्ज
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.
दरम्यान, कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर ओढावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. मात्र, देशात अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असताना पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.