East Central Railway Recruitment 2021: ईस्ट सेंट्रल रेल्वेत नोकर भरती, येत्या 30 एप्रिल पर्यंत करता येणार अर्ज
JOB प्रतिकात्मक फोटो (File Photo)

East Central Railway Recruitment 2021: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण ईस्ट सेंट्रल रेल्वेत Commercial cum Ticket Clerk पदावर नोकर भरतीची घोषणा केली आहे. त्यानुसार एकूण 60 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट ecr.indianrailways.gov.in येथे भेट द्यावी. अर्ज प्रक्रिया येत्या 30 एप्रिल 2021 पर्यंत सुरु असणारआहे.(नोकरीसाठी प्रथमच CV तयार करत असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा)

ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये कमर्शिअल कम तिकिट पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या शिक्षणाची अट ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 8 वी पास असणे आवश्यक आहे. तर वयाची कोणतीच अट घालण्यात आलेली नाही. फक्त अर्ज करताना कोणताही चूक होऊ नये हे लक्षात ठेवावे. कारण अर्जात चूक असल्यास तो मान्य केला जाणार नाही आहे.(Bank of Maharashtra Recruitment 2021: बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये अधिकारी पदांसाठी भरती जाहीर; 6 एप्रिल पूर्वी bankofmaharashtra.in वर करा ऑनलाईन अर्ज)

तसेच उमेदवारांना लेखी परीक्षा सुद्धा या पदासाठी द्यावी लागणार आहे. या लेखी परीक्षेत हिंदी, गणित आणि इंग्रजीसह परिक्षेचा कालावधी 2 तासांचा असणार आहे. ईसीआर भरती कमीत कमी 85 गुणांची असणार आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना फक्त 3 (ग्रेज पेज-200) पैसे दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त निवड प्रक्रिया संबंधित किंवा पदा बद्दल माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.