कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोने- चांदीच्या (Gold Rate Today) किंमतीत चढ- उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, आज सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. बिजनेस वेबसाईट गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोने व्यापाराच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 212.00 रुपयांच्या घसरणीसह 47 हजार 540 रुपयांवर बंद झाला आहे. तर चांदीचा मे महिन्यातील फ्यूचर ट्रेड 508.00 रुपयांच्या घसरणीसह 68 हजार 710 रुपयांवर बंद झाला आहे. ज्यामुळे लग्न सराईत सोने खेरदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
बिजनेस वेबसाईट गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे 22 कॅरेट सोने 46 हजार 350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 24 कॅरेट सोन्याची किंमत 50 हजार 570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याचबरोबर मुंबई 45 हजार 50 रुपये (22, कॅरेट) आणि 46 हजार 50 रुपये (24 कॅरेट), चेन्नई 44 हजार 940 (22 कॅरेट) आणि 49 हजार 30 रुपये (24 कॅरेट), कोलकाता 47 हजार 540 (22 कॅरेट) आणि 49 हजार 810 (24 कॅरेट). हे देखील वाचा- LPG Cylinder Offer: पेटीएमची जबरसदस्त ऑफर! गॅस सिलिंडरवर थेट 800 रुपयांपर्यंत करा बचत, 30 एप्रिलपर्यंत घेता येणार लाभ
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.
दरम्यान, कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर ओढावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. मात्र, देशात अटोक्यात येत असल्याचे चिन्ह दिसत असताना पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.