Paytm Brings Bumper Offer On LPG: कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील तेल विपणन कंपन्यांनी या महिन्यांच्या पहिल्या तारखेला गॅस सिलंडरच्या किंमतीत प्रत्येकी दहा रुपयांची कपात केली होती. परंतु, त्यानंतरही अनुदानाशिवाय 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपये इतकी आहे. सध्याची परिस्थिती पाहता एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींत आणखी घट होण्याची शक्यता कमी आहे. याचदरम्यान, एलपीजी गॅस बुकींगवर पेटीएमने कॅशबॅक ऑफर दिली आहे. या कॅशबॅक ऑफरअंतर्गत गॅस सिलिंडर बुक केल्यास 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे.
पेटीएमने सामन्य नागरिकांच्या डोक्याचा ताण करण्यासाठी ही ऑफर आणली आहे. दरम्यान, पेटीएमच्या या कॅशबॅक ऑफरअंतर्गत जर एखादा ग्राहक गॅस सिलिंडर बुक करतो तर त्याला 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे. ही ऑफर 30 एप्रिल 2021 पर्यंत वैध आहे. ही ऑफर केवळ अशाच ग्राहकांसाठी आहे जे प्रथमच एलपीजी सिलिंडर बुक करतील आणि पेटीएमद्वारे पैसे देणार आहेत. हे देखील वाचा- Army Recruitment 2021: भारतीय सेनेच्या डेंटल कोरमध्ये नोकर भरती, येत्या 18 मे पर्यंत उमेदवारांना करता येणार अर्ज
ट्वीट-
Get up to ₹800 cashback while booking your #Indane LPG refill on @Paytm. Book now: https://t.co/ppQr6a97In
Terms & Conditions Apply #LPGBooking pic.twitter.com/7YLyEBOKnP
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) April 22, 2021
आयओसीच्या निवेदनानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात नोव्हेंबर 2020 पासून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती वाढल्या आहेत. तथापि, मार्च 2021 च्या दुसर्या आठवड्यानंतर युरोप आणि आशियातील कोविड19 च्या वाढत्या प्रकरणांवर आणि लसीच्या इतर प्रभावांविषयी चिंतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे.