गोवा भाजपची वेबसाईट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
(प्रतिमा सौजन्य भाजप वेबसाईट स्क्रिनशॉट)

गोवा भाजपची वेबसाईट हॅक झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी (१५ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास ही वेबसाईट हॅक झाल्याचे समजते. दरम्यान, बेबसाईट हॅक झाल्याबाबत भाजपकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, गोवा भाजपच्या बेबसाईटवर जाता तेथे पाकिस्तान झिंदाबाद अशी अक्षरे दिसत आहेत. दरम्यान, ही बेबसाईट पाकिस्तानमधून हॅक करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

यापूर्वीही अनेक वेळा विविध कंपन्या, संस्था तसेच, विचारवंत आणि सेलिब्रेटी मंडळींच्या वेबसाईट हॅक झालेल्या आहेत. दरम्यान गोवा भाजपची बेबसाईट नेमकी कोणी हॅक केली याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही. मात्र भाजपच्या http://www.goabjp.org या संकेतस्थलावर जाता posted 'Pakistan Zindabad'असा संदेश दिसत आहे.