प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी GO Air एअरलाईन्सने नवा सेल सुरु केला आहे. या GO Air Fly Sale अंतर्गत प्रवाशांना तिकीटांवर सवलत मिळणार आहे. 24-26 फेब्रुवारीपासून दरम्यान तिकीट बुकींग केल्यास सवलत दिली जाणार आहे. या काळात तिकीट बुकींग केल्यानंतर प्रवाशांना 11 ते 15 एप्रिल या कालावधीतच प्रवास करावा लागणार आहे. तसंच या सेलअंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर सवलत देण्यात येणार आहे.
या योजनेत विमान तिकीटे केवळ 957 रुपयांपासून सुरु होणार आहेत. अहमदाबाद आणि इंदोर हा देशांतर्गत प्रवास केवळ 957 रुपयांत करता येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवरुन तुम्ही तिकीट बुकींग करु शकता. (विमानप्रवासात आरोग्याच्या या '5' समस्यांकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !)
इतर मार्गांवरील तिकीट दर:
कोची ते बंगळुरु प्रवास करण्यासाठी 1059 रुपये तर कोलकत्ता ते भुवनेश्वरसाठी 1529 रुपये मोजावे लागतील. पुणे ते बंगळुरू प्रवासाचे तिकीट दर 1590 रुपये असून मुंबई ते बंगळुरु प्रवास 1654 रुपयांत करता येईल. इंदोर ते नवी दिल्लीचे तिकीट दर 1543 रुपये असून हैद्राबाद ते गोवा 1659 रुपयांत करता येईल.
# कोची ते बंगळुरु- 1059 रुपये
# कोलकत्ता ते भुवनेश्वर- 1529 रुपये
# पुणे ते बंगळुरू- 1590 रुपये
# मुंबई ते बंगळुरु- 1654 रुपये
# इंदोर ते नवी दिल्ली- 1543 रुपये
# हैद्राबाद ते गोवा- 1659 रुपये
आंतरराष्ट्रीय तिकीट दर 5295 रुपयांपासून सुरु होत आहे.
आंतरराष्ट्रीय तिकीट दर:
अबुधाबी ते कन्नूर हा प्रवासाचे तिकीट 5626 रुपयांत उपलब्ध आहे. तर दिल्ली ते बँकाँक प्रवासासाठी 6232 रुपये तर मुंबई ते बँकाँक प्रवासाकरीता 6258 रुपये मोजावे लागतील.
# अबुधाबी ते कन्नूर- 5626 रुपये
# दिल्ली ते बँकाँक- 6232 रुपये
# मुंबई ते बँकाँक- 6258 रुपये
अलिकडेच कंपनीने व्हेलेंटाईन डे निमित्त तिकीटांवर खास सवलत जाहीर केली होती. आता पुन्हा एकदा कंपनी प्रवाशांसाठी दुसरा सेल आणला आहे. या सेलचा लाभ प्रवाशी अवश्य घेऊ शकता. मात्र ग्रुप बुकिंगवर ही सवलत दिली जाणार नाही.