Uttar Pradesh Shocker: लग्नाला नकार देणाऱ्या वडिलांची हत्या; मुलीसह तिच्या प्रियकराला अटक, उत्तर प्रदेश येथील घटना
Arrested (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) संभल जिल्ह्यात (Sambhal) गेल्या आठवड्यात एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. मृत व्यक्तीच्या मुलीने ही आत्महत्या असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, शवविच्छेदनाच्या अहवालात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या मुलीची कसून चौकशी केली. अखेर तिनेच प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

हरपाल सिंह असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हरपाल सिंह हे शेतकरी असून 20 जुलै रोजी त्यांचा मृतदेह गावातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. हरपाल यांनी आत्महत्या केल्याचे त्यांची मुलगी प्रीती सिंह हिने पोलिसांना सांगितले. तसेच पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पोलिसांनी हरपाल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हरपाल यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी प्रीतीची कसून चौकशी केली अखेर तिनेच प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचे कबूली दिली. या घटनेनंतर संपूर्ण परसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Pune: पुण्यात 16 वर्षीय मुलीची गळाफास लावून आत्महत्या, पोलीस तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतीचे एका धर्मेंद्र नावाच्या तरूणासोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ज्यानंतर हरपाल सिंह हे दोघांचे लग्न करून देण्यास तयार झाले. परंतु, त्यांनी धर्मेंद्र याच्याकडे काही जमीनीची मागणी केली. तसेच जमीन न दिल्यामुळे लग्नास नकार दिला. यावर संतापलेल्या प्रीतीने आपल्या वडिलांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार, 19 जुलै रोजी त्यांनी हरपाल यांना भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येला आत्महत्येचे रुप देण्यासाठी प्रीती आणि धर्मेंद्रने गावाजवळील एका झाडाला हरपाल यांचा मृतदेह लटकवला. तसेच हरपाल यांनी आत्महत्या केल्याचे सांगत लोकांची आणि पोलिसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.