Ashok Gehlot (Photo Credit - Facebook)

Rajasthan: राजस्थानमध्ये अखेर रविवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याचवेळी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Deputy CM Sachin Pilot) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांच्यात अनेक दिवसांपासून खडाजंगी सुरू होती. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तारानंतर राजकीय पेच मिटणार आहे. मंत्रिमंडळात 11 कॅबिनेट आणि 4 नवीन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. यासोबतच राजभवनात ४ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले होते, त्यापैकी रघु शर्मा, हरीश चौधरी, गोविंद सिंग दोतसरा यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले होते. सध्या नव्या मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. पायलट कॅम्पमधून 4 मंत्री झाले आहेत. यासोबतच ३ राज्यमंत्र्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.

एकूण 15 मंत्री असतील

खरं तर, शनिवारी सीएम गेहलोत राजभवनात पोहोचले आणि त्यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली आणि रविवारी दुपारी 4 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याबाबत चर्चा केली. या बैठकीमुळे केवळ 3 मंत्री फिरणार असल्याचे निश्चित झाले. कारण केवळ तीन मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे मंजुरीसाठी सादर केले होते. ज्यांना मान्यता देण्यात आली आहे. मात्र, तत्पूर्वी शनिवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले. (हे ही वाचा महिलेच्या गायनावर प्रेक्षक इतका झाला प्रसन्न केला चक्क तिच्यावर पैशाचा पाऊस, पाहा व्हिडिओ.)

काँग्रेसने राजस्थानात पंजाबचा फॉर्म्युला वापरल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार 12 नवे मंत्री आणि तीन जुन्या राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कॅबिनेटमध्ये पहिल्यांदाच चार अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जुली आणि गोविंद मेघवाल या चार दलित नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे.