Gadar 2 Poster (PC- Twitter)

Gadar 2: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर 2 च्या स्क्रिनिंगच्या वेळी पटना येथील रीजेंट सिनेमा हॉलच्या बाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकले.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीतून सुदैवाने बॉम्बचा स्फोट झाला नाही आणि कोणीही जखमी झाले नाही. मात्र, त्यामुळे सिनेमागृह परिसरात खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी सिनेमा हॉलच्या अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची केल्यानंतर ही घटना घडल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. बॉम्ब फेकून त्यांनी काही वेळातच तेथून पळ काढला.

आयएएनएसनुसार, पीरबाहोर पोलिस ठाण्यात या घटने अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आगदर 2: पटना चित्रपटगृहाबाहेर बॉम्ब फेकण्यात आला, चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांना मारहाणहे. सिनेमा हॉलचे सीसीटीव्ही फुटेजही तपासासाठी पोलिसांना देण्यात आले आहे. दरम्यान, चित्रपटगृह मालकाने बॉलिवूड हंगामाला सांगितले की, अज्ञात व्यक्तींना चित्रपटाच्या तिकिटांचा काळाबाजार करायचा होता.त्यांनी कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केले आणि त्यांना परिसर सोडण्यास सांगितल्यानंतर बदला म्हणून त्यांने बॉम्ब फेकला आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी या अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. गदर २ सिनेमाने काही दिवसांतच मोठी कमाई केली आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित, गदर 2 हा गदर: एक प्रेम कथाचा सीक्वल आहे, जो 2001 मध्ये रिलीज झाला होता. सनी देओल तारा सिंगच्या भूमिकेत परत आला आहे, तर अमीषा पटेलने सिक्वेलमध्ये सकीनाची भूमिका पुन्हा केली आहे.