छत्तीसगढ चे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमात; डॉक्टरांची माहिती
Former Chhattisgarh Chief Minister Ajit Jogi (PC - Facebook)

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी (Former Chhattisgarh Chief Minister Ajit Jogi) कोमात गेल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. जोगी यांना शनिवारी हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना सध्या व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. मात्र, आज त्यांची प्रकृती गंभीर झाली असून ते कोमात गेले आहेत.

अजित जोगी यांना रायपुरमधील श्री नारायणा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पुढील 48 तास हे महत्त्वाचे असून त्यांचे शरीर औषधांना कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Lockdown: लॉकडाऊन नंतर पुढे काय? केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली मार्गदर्शक तत्वं)

दरम्यान, शनिवारी अजित जोगी यांच्या मुलाने आपल्या वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली होती. राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली होती. जोगी यांनी 1988 च्या दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेससोबतच्या मतभेदानंतर त्यांनी 'जनता काँग्रेस छत्तीसगढ' असा पक्ष स्थापन केला.