![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/69-156.jpg?width=380&height=214)
Fire Breaks Out At Mahakumbh: शनिवारी पुन्हा एकदा प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभमेळा (Mahakumbh 2025) परिसरात आगीची घटना घडली. प्रयागराजच्या सेक्टर 18 आणि 19 मधील अनेक तंबू या आगीत (Fire) जळून खाक झाले. प्रशासनाला याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या अनेक जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अनेक तंबू आणि छावण्या जळून राख झाल्या. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रयागराज मेळा परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेवर महाकुंभाचे डीआयजी वैभव कृष्ण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितलं की, 'आगी पूर्णपणे नियंत्रणात आहे. सेक्टर 19 मध्ये कल्पवासींनी रिकामे केलेल्या काही जुन्या तंबूंना ही आग लागली. यात कोणीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. (हेही वाचा - Nepal Balloon Explosion: फुग्याच्या स्फोटातून थोडक्यात बचावले नेपाळचे उपपंतप्रधान; नेमकं काय घडलं? जाणून घ्या)
पहा व्हिडिओ -
Fire Breaks Out At Mahakumbh 2025: कुंभ मेला क्षेत्र में लगी आग, दमकल की कई गाड़ियां रवाना #Mahakumbh2025 #Fire #CMYogi #LatestNews pic.twitter.com/cDt8GQ0lO3
— Moaz (@moaz20in) February 15, 2025
7 फेब्रुवारी रोजीही लागली होती महाकुंभात आग-
दरम्यान, 7 फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळा परिसरात आग लागली होती. त्यावेळी हरिहरानंद यांच्या तंबूला आग लागली होती. तंबूतून उंच ज्वाळा उठताना दिसत होत्या. मात्र, अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली होती. महाकुंभमेळा परिसरातील आगीच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता.
याच दरम्यान, शंकराचार्य मार्गावरील सेक्टर 18 मध्ये आग लागली होती. आगीची माहिती मिळताचं अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले होते. कुंभमेळा परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तत्पूर्वी, महाकुंभमेळ्यातील सेक्टर 22 च्या बाहेरील चमनगंज चौकीजवळील एका तंबूला आग लागली होती. यामुळे 15 तंबू जळून खाक झाले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली होती. महाकुंभ सुरू झाल्यापासून आतापर्यंत तीन ते चार वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.