Photo Credit- X

Gujarat Accident: गुजरात येथील बनासकाठा जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अंबाजी देवीचे दर्शन घेऊन घरी परतनाऱ्या यात्रेकरूच्या बसचा अपघात झाला. बस पलटी झाल्याने यात अनेक प्रवासी जखमी झाले. बसमध्ये जवळपास ५० प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. हेही वाचा- अनियंत्रित कंटेनरच्या धडकेत चार वाहने चक्काचूर, नाशिक मुंबई महामार्गावर अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दांता तालुक्यातील त्रिशुलीया घाटात वाहन चालकाचे बसवरील नियत्रंण सुटल्याने बस पलटली. या बसचा अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवाशी जखमी झाले. अपघाताची तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ जण गंभीर जखमी झाले आहे. तर २५ जणांना किरकोळ जखम झाली. त्यांना जवळच्या पालनपूर आणि अंबाजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस चालकाचे वाहनांवरिल नियंत्रण सुटल्याने बस पटली झाली. घटनास्थळी पोलिस अधिकारी अक्षय राज पाहणी केली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.