Kasara Accident: अनियंत्रित कंटेनरच्या धडकेत चार वाहने चक्काचूर, नाशिक मुंबई महामार्गावर अपघात
कसारा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनरच्या धडकेत या घटनेत तिघे प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारच्या पहाटे घडला आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात हा अपघात घडल्याची माहिती आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.
Kasara Accident: कसारा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनरच्या धडकेत या घटनेत तिघे प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारच्या पहाटे घडला आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात हा अपघात घडल्याची माहिती आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. (हेही वाचा-शहरात आणखी एक Hit And Run प्रकरण, कारची दुचाकीला धडक; खासदाराचा मुलगा गणेश हंडोरे याला अटक0
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कंटेनरची चार वाहनांना धडक लागल्याने हा अपघात घडला. या अपघातात चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते. कंटेनर भरधाव वेगात होते, अचानक वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला, असी माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती मिळताच,स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचा व्हिडिओ
View this post on Instagram
कंटेनरची चार वाहनांना धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती, चारही वाहने चक्काचूर झाले. पोलिसांच्या मदतीने जखमींना अपघातग्रस्त वाहनांतून बाहेर काढण्यात आले. जखमींना जवळच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघातस्थळी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर वाहतूक सेवा सुरळीत केली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2024 10:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

