मुंबईतील तलावांमधील आजची पाणी पातळी: 7 तलावांमधील पाणीसाठा 90.06 टक्क्यांवर
मुंबई मध्ये जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. आता एकूण पाणीसाठा 90% च्या पार गेला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये आता पाणीसाठा 90.06 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे आता शहराची पुढील वर्षभरासाठीची पाणी चिंता मिटली आहे. विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर हे तलाव जुलैमध्येच ओव्हरफ्लो झाले झाले आहेत. मात्र अद्याप मुंबईमधील 10% पाणी कपात कायम आहे. सध्याचा समाधानकारक पाऊस पाहता ही पाणीकपात देखील लवकरच मागे घेतली जाईल. सध्या मध्य वैतरणा गेट ६ जुलैपासून बंद करण्यात आला असून अप्पर वैतरणाचा विसर्ग थांबवला आहे.
मुंबईतील पाणीसाठा 90% पार
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल #MyBMCUpdates pic.twitter.com/kESf2js1Z3
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 3, 2026
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2026 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

