Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

Faridabad Murder: १५ वर्षांच्या मुलीचे प्रथम अपहरण करून नंतर चाकूने भोसकून हत्या, हरियाणातील फरिदाबाद येथील घटना

हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीची तिच्याच शेजारच्या घरात हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, 18 जानेवारी रोजी मुलगी शेजारच्या ममता च्या घरी गेली होती. दरम्यान, 19 वर्षीय आरोपी पवन तेथे पोहोचला आणि त्याने मुलीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर चाकूने तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले.

राष्ट्रीय Shreya Varke | Jan 20, 2025 01:54 PM IST
A+
A-
Faridabad Murder

Faridabad Murder: हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीची तिच्याच शेजारच्या घरात हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, 18 जानेवारी रोजी मुलगी शेजारच्या ममता च्या घरी गेली होती. दरम्यान, 19 वर्षीय आरोपी पवन तेथे पोहोचला आणि त्याने मुलीशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर चाकूने तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर वार केले. जेव्हा शेजाऱ्यांनी पवनला रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये बाहेर येताना पाहिले. त्यामुळे ते ताबडतोब घराच्या आत गेले. यानंतर जखमी मुलीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली आरोपी पवन यापूर्वीच तुरुंगात गेला आहे. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. हेही वाचा: Nandurbar Violence: रिक्षा आणि मोटारसायकलमध्ये धडक, दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना; परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात (Watch Video)

यापूर्वीही केले होते अपहरण 

या वर्षी एप्रिल महिन्यात मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पवनला अटक करण्यात आली होती. पवन आणि त्याचा मित्र शोएब यांनी लग्नाचे आमिष दाखवून मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या आईने केली होती. त्यावेळी पवनला भादंविकलम ३६३, ३६६-ए आणि ३४ अन्वये अटक करण्यात आली होती. पवनला सप्टेंबरमध्ये जामीन मिळाला असून हा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे.

कुटुंबीयांवर धमकावण्याचा आरोप

पवन, त्याचा भाऊ, आई-वडील आणि मित्राने गुन्हा मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. मात्र, यापूर्वी अशी कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. फरिदाबाद पोलिसांनी पवन, त्याचा लहान भाऊ, आई-वडील आणि मित्राविरोधात खून, धमकावणे आणि कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनचे कुटुंब भंगाराचा व्यवसाय करतात. सध्या आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत आहेत.


Show Full Article Share Now