Hathras Case: आज हाथरस प्रकरणाची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनऊ खंडपीठात (Lucknow Bench) सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पीडितेच्या कुटुंबातील सदस्य राजधानी लखनऊला रवाना झाले आहेत. एसडीएम अंजली गंगवार यांनी सांगितले की, 'मी स्वत: कुटुंबासमवेत जात आहे. पीडितेच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. डीएम आणि एसपी देखील एकत्र राहतील. न्यायालयात पीडितेच्या परिवारातील सदस्य यासंदर्भात साक्ष देतील. प्राप्त माहितीनुसार, पीडितेचे वडील, आई, भाऊ यांच्यासह 5 लोक न्यायालयात साक्ष देणार आहेत.
दरम्यान, पीडितेच्या कुटुंबिंयांना रविवारीचं लखनऊला घेऊन जाण्याची पोलिसांची योजना होती. परंतु, कुटुंबाने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे सांगून रात्री जाण्यास नकार दिला. हायकोर्टाने हाथरस घटनेची दखल घेतली आहे. कोर्टाने प्रधान सचिव गृह, डीजीपी, एसपी आणि डीएम हाथरस यांना समन्स बजावले आहे. (हेही वाचा - Bihar Gangrape: धक्कादायक! बॅंकेत जात असताना एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार; बिहारमधील बक्सर येथील घटना)
I am going with them. Proper security arrangements have been made. District Magistrate (DM) and Superintendent of Police (SP) is also accompanying us: Anjali Gangwar, SDM. https://t.co/htZjdmNGjl pic.twitter.com/I66jjrt2Gt
— ANI UP (@ANINewsUP) October 12, 2020
हाथरस घटनेचा तपास करण्यासाठी रविवारी संध्याकाळी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ची टीम चंदपा पोलिस स्टेशन परिसरातील बुलागढी गावात आली. रविवारी सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा नोंदवण्यापूर्वी यूपी सरकारने सीबीआयकडे तपासासाठी शिफारस पाठविली होती.
गेल्या महिन्यात 14 सप्टेंबर रोजी हाथरस जिल्ह्यातील चंदपा भागात 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर पीडितेला अलीगडच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला तातडीने दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, 29 सप्टेंबर रोजी पीडितेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी रात्रीचं पीडितेचे अंत्यसंस्कार केले होते. यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी देशात निदर्शने करण्यात आली.