प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हाथरसनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेची मागणी होत असताना सामूहिक बलात्काराच्या हादरून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच बिहार (Bihar) येथील घटनेने आणखी भर टाकली आहे. बिहारमधील बक्सर (Buxar) येथे आपल्या 5 वर्षाच्या मुलासह बॅंकेत जाणाऱ्या एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हेतर, बलात्कारानंतर या महिलेला मुलासह बांधून नदीत फेकून दिले. ज्यात लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका जणांना अटक केली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित महिला ही आपल्या पाच वर्षाच्या मुलासह बिहारच्या मुरार ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ओझा, बराव गावात बॅंकेत गेली होती. मात्र, 11 वाजल्यानंतर पीडित महिलेचा मोबाईल बंद येऊ लागल्याने तिच्या घरच्यांना चिंता वाटू लागली. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी पीडित आणि तिचा मुलगा नदीमध्ये बांधलेल्या अवस्थेत तिच्या वडिलांना आढळले. दरम्यान, पीडित महिलेला वाचवण्यात तिच्या वडिलांना यश आले. परंतु, दुर्देवाने तिच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. सध्या पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत, अशी महिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Madhya Pradesh: 16 व्या मुलाला जन्म दिल्यानंतर आई व नवजात अर्भकाचा मृत्यू, CMO नी दिले चौकशीचे आदेश

एएनआयचे ट्विट-

दरम्यान, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतना दिसत आहे. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे. यामुळे आंध्रप्रदेशच्या सरकारप्रमाणे संपूर्ण देशात दिशा कायदा संमत करण्यात यावा, अशी मागणींनी जोर धरला आहे.