Today Gold-Silver Price: सोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचा दर
Gold | Representational Image (Photo Credits: Pixabay)

रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या (Gold Price) किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवण्यात आली आहे. MCX वर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण 47,095 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली आहे. त्याच वेळी, चांदीच्या (Silver  price) किंमतीत 0.33 टक्के घट झाली आणि त्याची किंमत 63,156 रुपये प्रति किलो नोंदवली गेली. रुपयामध्ये 29 पैशांची मजबुती नोंदवण्यात आली आहे. अलीकडील उसळीमुळे अमेरिकन डॉलर 73 च्या उच्चांकावर बंद झाला. गेल्या 12 आठवड्यांत रुपयामधील ही सर्वात मोठी उडी आहे. भारताच्या सोन्याच्या किंमतीमध्ये 10.75 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी समाविष्ट आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे धातूचे भाव खाली येतात. जागतिक बाजारातही सोन्याचे दर खाली आले आहेत.

सध्या सोन्याची किंमत 1,1813.93 डॉलर प्रति औंस होती. सोन्याचे वजन, डॉलर निर्देशांक 0.09 टक्क्यांनी वाढून गेल्या तीन आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचला.  दुसरीकडे इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 23.88 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी वाढून 1,015.49 डॉलरवर स्थिर राहिली. हेही वाचा Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेल दरामध्ये ग्राहकांना दिलासा, पाहा आजचे दर

भारतीय बाजारात काल सोन्याच्या किंमतीत 0.02 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. मागील आठवड्याच्या सरासरी 47,485.7 रुपयांच्या तुलनेत हे 0.24 टक्के कमी आहे. सध्या भारतात सोन्याची किंमत 47,095 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याच वेळी, बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,370 रुपये प्रति 10 ग्रॅम असल्याचे सांगितले गेले.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत 48,670 प्रति दहा ग्रॅम नोंदवली गेली. दुसरीकडे, जर आपण इतर शहरे आणि राज्ये पाहिली तर कोलकातामध्ये 48,600 रुपये, गुरुग्राममध्ये 48,500, जयपूरमध्ये 48,585 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवले गेले. तर मुंबईमध्ये सोने 47,380 रुपये प्रति दहा ग्रॅम विकले जात आहे.

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची सहावे सत्र सुरू झाले आहे. तुम्ही यामध्ये 3 सप्टेंबर 2021 पर्यंत गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) साठी इश्यू किंमत 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकार 50 रुपयांची सूट देत आहे. ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. अशा स्थितीत तुम्ही 10 ग्रॅम सोन्यावर 500 रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.